जळगाव । चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे देशामध्ये बंदी असेलेले आणि कुठेही विक्रीसाठी परवानगी नसताना पत्र्याच्या शेडमध्ये दडवलेला १८ लाख रुपये किंमतीचा कापसाचा बोगस बियाण्यांचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात नितीन नंदलाल चौधरी (वय -३८) रा. चुंचाळे ता.चोपडा याच्याविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुल खेडा रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये बनावट बियाण्यांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पो. कॉ. विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांच्या पथकाने दुपारी धाड टाकली.
त्यात १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे १२७३ बनावट एचटीबीटी कापूस बियाण्यांचे पाकिटे आढळून आले. कापूस बियाणे, पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत आरोपी नितीन चौधरी विरोधात विकास बोरसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चोपडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.
Discussion about this post