जळगाव जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीय. बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी चोपडा धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चोपडा नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली असताना, चोपड्या पासून पाच किमी अंतरावर असलेल्या सूतगिरणी जवळ, समोरून येणाऱ्या कार आणि बसचां जोरदार अपघात झाला.
यावेळी कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. कार मधील चौघे मनदेवीच्या दर्शनासाठी जात होते. मनुदेवीला त्यांच्या मार्फत आज महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी अपघात झाला.
Discussion about this post