चोपडा । चोपडा-विरवाडा रस्त्यावर एक भीषण अपघाताची घटना घडलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आदळलीय. या भीषण अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती
चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती आहे.
या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी आहे. राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत असे मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत. तर बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत (गिरासे)आणि विजय अमृत भोई असे जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करत आहेत.














Discussion about this post