भडगाव । तालुक्यातील गोंडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज गोंडगावला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाले कि, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचा घटना या दुर्देवी आहे. यातील आरोपीला शिक्षा हि व्हायलाच हवी, हीच सरकारची भूमिका आहे. राज्यात महायुतीचं सरकार असून महिला आणि मुलींची सुरक्षा हा महायुती सरकारचा टॉप प्रायोरिटीचा विषय असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
राज्यात कुठेही महिला अत्याचाराची घटना घडली तर आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही. कुणीही आरोपी असला तरी त्याला शिक्षा व्हावी, ही सरकारची भूमिका आहे, असंही त्या म्हणाल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अशा प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून असतात. त्यामुळे आगामी काळात राज्यातील मुली भयमुक्त वातावरणात वावरतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Discussion about this post