२०१९ साली चीनमधून उगम झालेल्या कोरोना व्हायरसनं अख्या जगभरात धुमाकूळ घालत असंख्य लोकांचा जीव घेतला. आता जगाला पुन्हा धडकी भरली आहे. ती म्हणजे चीनमधील तज्ज्ञांच्या एका पथकाने नवीन कोरोना विषाणू आढळल्याचा दावा केलाय. हा विषाणू माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्ये पसरू शकतो. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा कोरोना साथीच्या आजाराची परिस्थिती उद्भवणार का? अशी भीती सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
बॅटवूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी झेंगली यांच्या नेत्तृत्वाखाली एका पथकानं हा विषाणू शोधला आहे. झेंगली हे ग्वांगझू प्रयोगशाळेचे प्रमुख विषाणूशास्त्रज्ञ आहेत. यासंदर्भात संशोधकांनी सांगितले की, ‘आम्ही HKU5-CoV चे वेगळ्या लिनेजचा शोध घेतला आहे. जे केवळ वटवाघूळ ते वटवाघूळ यांच्यात पसरत नसून, मानव आणि इतर प्राण्यांमध्ये देखील संक्रमित होऊ शकतो’. अशी माहिती संशोधकांनी दिली.
संशोधकांना असे आढळून आले की, वटवाघळांपासून माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे. हा व्हायरस त्याच मानवी रिसेप्टरचा वापर करतो. हा व्हायरस थेट कोणत्याही माध्यमातून पसरू शकतो. यात ४ वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे. या पैकी दोन वटवाघळांमध्ये आढळतात. या विषाणूवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
शी झेंगली यांच्या टीमनं पुढे सांगितलं की, HKU5-CoVचा धोका अद्याप नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विषाणूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. टीमनं पुढे स्पष्ट केलं की, हा विषाणू कोविडपेक्षा अधिक घातक नाही. त्यामुळे मानवाला जास्त धोका नाही.
Discussion about this post