जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय रस्ते मार्गाने धुळेकडे रवाना झाले. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री महोदयांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Discussion about this post