मुंबई । राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. केळी पिकांवर अनेक संकट आल्याने केळीची पीकं आणि शेतकरीही धोक्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने केळी महामंडळ स्थापनाची घोषणा केली होती.
परंतु अद्यापही केळी महामंडळाची स्थापनाच झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. त्यामुळे केळी महामंडळाची स्थापना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत केली.
आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन दिले. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
Discussion about this post