मुंबई । सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून अनेक ठिकाणी आंदोलन, रास्ता रोकोसह गाड्यांची तोडफोड केली जात. यातच मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय घेतले? त्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची उपसमतिची बैठक पार पडली. या बैठकमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा झाल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ‘आजच्या उपसमितीसोबत झालेल्या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा झाली. त्यामध्ये शिंदे समिती गठीत केली होती. जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी आणि शोधण्यासाठी त्या समीतीने पहिला अहवाल आज सादर केला. तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याची पुढची प्रक्रिया करणार आहोत. शिंदे समितीमध्ये जवळपास एक कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ११,५३० कुणबी जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत.’