Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मिशन मोडवर काम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
महिलांसाठी सरकारची लयभारी योजना! मिळणार 6000 रुपये; जाणून घ्या फायदा कसा घ्यावा..
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जळगाव जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्या सोबतच ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 28 जून 2024 पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत शासनामार्फत केली जाणार आहे. या योजनेची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच लाभार्थी महिला यांची फरपट होऊ नये यासाठी सर्व गट विकास अधिकारी यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी तालुक्यातील बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधने व त्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांचे बँक खाते उघडले जातील याची सुनिश्चिती करणे, पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखातून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तात्काळ पुरवण्यासाठी नियोजन करणे, ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखातून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक आहे त्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तात्काळ पुरवण्यासाठी नियोजन करणे व ग्रामसेवक यांना त्या दृष्टीने निर्देश देणे, योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांना आवश्यक सहकार्य करणे, आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज स्वीकृती करणे तपासणी करणे, पोर्टल वर अपलोड करणे बाबतच्या कामकाजाचे नियोजन करणे, प्रत्येक गावात योजनेची दवंडी देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रसार करणे यासाठी नियोजन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नियोजनबद्ध रीतीने होईल, लाभार्थ्यांना सुलभ रीतीने योजनेचा लाभ मिळेल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी तसेच सदर योजनेच्या अनुषंगाने अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत पातळीवर अर्ज होणार उपलब्ध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा दृष्टीने व महिलांना अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.लाभार्थी महिला,अंगणवाडी सेविका,बचत गटाचे अध्यक्ष ,सचिव, ग्रामसेवक हे या योजनेचे अर्ज भरुन देऊ शकतात.

फॉर्म निशुल्क, शुल्क देऊ नये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज दाखल करणे किवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क शासनातर्फे आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किंवा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धावत्या लोकलखाली झोपून पिता-पुत्राने आत्महत्या ; घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Next Post

सुसाईड नोट लिहून जळगावच्या उच्चशिक्षित तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सुसाईड नोट लिहून जळगावच्या उच्चशिक्षित तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page