नागपूर | आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रत्येक गोष्टीशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संबंध जोणाऱ्या भाजपच्या एका आमदारावर चांगलेच संतापले.
राज्यातील लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या अवैध दारूबंदी असल्याचे भाजप आमदार अभिमन्यू पवार सभागृहात माहिती देताना सांगितले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना वारंवार प्रत्येक गोष्टीत आणू नका, नाहीतर घरी बसावे लागले, अशा कठोर शब्दांत अभिमन्यू पवार यांनी सुनावले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री संतप्त होत झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
“आपण लाडक्या बहीणी म्हणतो, पण लाडक्या बहिणींचे दु :ख अवैध दारूवर आळा घालणे आहे. यावर बैठक घेण्याची गरज आहे. याबाबत आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश देऊनही काही होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे”, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात सांगितले.
या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहीणींच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल. लाडक्या बहीणींच्या योजनाचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरुच राहिल. त्या योजनाला दुसऱ्या योजनेसोबत तुलना करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आपण जर निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात येईल,” असे उत्तर फडणवीसांनी सभागृहाला दिले.















Discussion about this post