छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध विभागांतील रिक्त पदांसाठी एकूण २२२ जागांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा तसेच निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा,. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्च आहे.
रिक्त पदांची नावे :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 32
2) उपअग्निशमन केंद्र अधिकारी 04
3) सहाय्यक सुरक्षा अधिकारी 01
4) स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक 24
5) स्वच्छता निरीक्षक 12
6) पशुधन पर्यवेक्षक 07
7) चालक-यंत्रचालक (Driver Operator) 15
8) उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक 06
9) अनुलेखक (ट्रेसर) 09
10) अग्निशामक 100
11) रोखपाल 12
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र.4: (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tracer/Draftsman)
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र.11: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जाहिरात (PDF) |
Click Here |
वयाची अट: 31 जानेवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.7 & 10: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अनाथ/मागासवर्गीय: ₹900/-]
| Online अर्ज | Apply Online |















Discussion about this post