मुंबई । अजित पवार यांनी केलेल्या बंडावर छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर आज त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. सकाळी उठलं विचार केला अन् शपथ घेतली असं होत नाही. आम्ही सगळ्या बाबींचा विचार केला. कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या. मगच राष्ट्रवादी भाजपसोबत आली, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
पहाटेचा शपथविधी का झाला, त्यामागचं कारण जनतेला कळलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत. नागालँडमध्ये राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत गेला. मग आम्हीही राष्ट्रवादीसोबत आलो आहोत. आम्हालाही पाठिंबा द्या. शरद पवारसाहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करू, असं भुजबळ म्हणाले.
Discussion about this post