मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा असून अशातच विधानसभा निवडणुकीत तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा”, असे चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले.
छगन भुजबळांनी एका वृत्त वाहिन्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन एक प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे पाटील कायम आम्ही सत्ताधाऱ्यांच्या इतक्या जागा पाडणार असे म्हणत असतात. तुम्ही याकडे कसे बघता? असा प्रश्न छगन भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी अरे बाबा तुला काय करायचं ते कर पण २८८ जागा लढवं, असे म्हटले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“मनोज जरांगे पाटील यांनी रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे. प्रत्येकवेळी कशाला भूमिका बदलता उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठतो. मग म्हणतात मुस्लिमाना आरक्षण द्या. अहो मुस्लिमांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात. अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्यचे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार. अरे बाबा तुला काय करायचं ते कर. पण २८८ जागा लढवं”, असे छगन भुजबळ म्हणाले.
जरांगेंनी माझ्यासमोर येऊन उभंच राहावं. ते एकदा म्हणणार,. मला राजकारण नको. मला राजकारणात जायचं नाही. परत २८८ उमेदवार पाडण्याचा विचार करणार. एक एकाला बोलावून सर्वांची माहिती घेत आहेत. फार काही चालू आहे. त्यांना फार गंभीर घेऊ नका, असेही छगन भुजबळांनी म्हटले.















Discussion about this post