महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असून त्यांनी आपल्या मनातील खदखद स्प्ष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर छगन भुजबळ हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तवले जात होते.
मात्र, आता छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. मात्र या भेटीत ओबीसींच्या मुद्यावर त्यांची चर्चा झाली असल्याचे भुजबळांनी सांगितले होते. मात्र त्यावेळी भुजबळांची थेट भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना तूर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. कारण छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. तसेच महायुतीत वाद नको म्हणून छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुखावू इच्छित नाही. तसेच महायुतीत छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा असं भाजपच्या दिग्गज नेत्याचं मत आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या महायुतीतील नाराज असलेल्या नेत्यांसंदर्भात महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Discussion about this post