जळगाव । सध्या फसवणुकीचे प्रमाण भरमसाठ वाढले असून यातच एरंडोल येथील एका उच्चशिक्षित महिलेची ८ लाख ५५ हजार ४१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एरंडोल येथील रहिवासी तथा महाविद्यालयात नोकरीला असलेल्या शर्मिला अनिल चिकाटे (वय ५०) यांना शुक्रवारी वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर सपोर्ट-४, एपीके, कम्प्लेंट रजिस्टर एपीके व एनी- डेस्क या ॲप्लिकेशनची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगितले.
दरम्यान, त्यांनी विश्वास संपादन करीत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत कॅनरा बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती चोरली. चोरलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी खात्यातून ८ लाख ५० हजार ४१ रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शर्मिला चिकाटे यांनी शनिवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बी. डी. जगताप करीत आहेत.
Discussion about this post