भारतासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला कारण भारताच चांद्रयान-3 बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रावर पोहोचण सोप नव्हतं. खूप अवघड टप्पे होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी सिद्ध करुन दाखवलं.
दरम्यान, चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला. प्रॉप्लशन मॉड्युल चंद्राभोवती भ्रमण करत आहे. आता विक्रम लँडर आणि त्यामध्ये असलेला रोव्हर चंद्रावर काय करणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊया.
विक्रम लँडरमधील चार पेलोड्स काय काम करणार?
रंभा – चंद्राच्या पुष्ठभागावर सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या प्लाज्मा कणाच घनत्वाचा अभ्यास करेल.
चास्टे – चंद्राच्या पुष्ठभागावरील तापमानाचा अभ्यास करणार.
इल्सा – लँडिंग साइटच्या आस-पास चंद्रावर भूकंप कशामुळे येतो, त्याचा अभ्यास करेल.
लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे – चंद्राच डायनामिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार.
प्रज्ञान रोव्हरमधील दोन पेलोडस काय काम करणार?
लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (Laser Induced Breakdown Spectroscope – LIBS). चंद्राच्या पुष्ठभागावरील रसायनांच प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. त्याशिवाय खनिजांचा शोध घेईल.
अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS) हा एलिमेंट कंपोजिशनचा अभ्यास करेल. मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि टिन लँडिंग साइटच्या आसपास चंद्राच्या पुष्ठभागावर या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न होईल.
Discussion about this post