श्रीहरिकोटा । भारताची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज प्रक्षेपित करण्यात आली. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण आज शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले.
चांद्रयान-3 मिशन हे 2019 मध्ये केलेल्या चांद्रयान-2 मिशनचे फॉलो-अप मिशन आहे. या मोहिमेत लँडर आणि रोव्हरचे सॉफ्ट लँडिंग पृष्ठभागावर धावताना दिसणार असून, त्याद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे.
चांद्रयान-३ मिशनमध्ये लँडर, रोव्हर यांचा समावेश आहे. मिशनमध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. लँडर, रोव्हर 14 दिवस सक्रिय राहतील. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल. चांद्रयान-३ च्या वजनाबद्दल बोलायचे तर लँडर मॉड्यूलचे वजन १.७ टन आहे. प्रोपल्शनचे वजन सुमारे 2.2 टन आहे. लँडरमध्ये ठेवलेल्या रोव्हरचे वजन 26 किलो आहे.
चांद्रयान-1 मिशनमध्ये 386 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याचवेळी चांद्रयान-2 मोहिमेचा खर्च 978 कोटी रुपये होता. आता चांद्रयान-३ मोहीमही खूप किफायतशीर आहे. त्याची किंमत 615 कोटी रुपये आहे.
Discussion about this post