जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी मुक्ताईनगर मतदारसंघात मतदान चोरी झाल्याचं ट्विट केलं होतं. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट रोहिणी खडसे यांच्या दोन ठिकाणच्या मतदानाची यादीच दाखवली.
रोहिणी खडसे यांनी दोन ठिकाणी मतदान केलं याचे पुरावे आम्हाला काढायला लावता का? महिला भगिनी आहे म्हणून आम्ही हे करत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले. माझ्या मतदारसंघात 43 हजार मतदान हे दुबार तिबार आहे, तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती.
हायकोर्टात दाद मागितल्याचे पाटील म्हणाले. रोहिणी खडसे या पराभवाचे खापर फोडतायेत. मी बोगस मतदाना संदर्भात हायकोर्टात गेलो असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहिणी खडसेंनी का? टिव टिव केलं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.















Discussion about this post