पुणे । महाराष्ट्रात सध्या गारठा वाढला असून आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे.दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोबतच आज म्हणजेच 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
काही ठिकाणी पावसाची हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.















Discussion about this post