मुंबई । राज्यातील मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पाडणार आहे. झारखंडमध्ये तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झालीय. ते सध्या चक्रीय स्थितीमध्ये आहे. तर सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा रेषा सक्रीय झालाय. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्याच्या चौफेर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय.
रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
येत्या २५ आणि २६ सप्टेंबरला मात्र राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच घाट माथ्यावर सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर काही ठिकाणी मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.
२५ सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. राज्यात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही ठिकाणी ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.
Discussion about this post