चाळीसगाव । चार लाखांची लाच घेताना चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्याला नाशिक एसीबीने रंगेहात अटक केली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) असे लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याचे नाव असून या कारवाईने बांधकाम विभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात आरोपी विसपुते यांनी पाच लाखांची लाच मागितली मात्र चार लाखात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार हे नाशिकमध्ये आल्यानंतर गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच विसपुते यांना अटक करण्यात आली.
Discussion about this post