चाळीसगाव । चाळीसगावच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारमध्ये बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे
हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. याचे गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी कसुन चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.
Discussion about this post