चाळीसगाव । चाळीसगावमधून हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज रविवारीसायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव असून याबाबत पोलीसांनी चार संशयितांना अटक केली.
याबाबत असे की, चाळीसगाव शहरात क्रीकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी मयत घोषीत केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
चाळीसगाव शहरा खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post