चाळीसगाव । चाळीसगाव तालुका दोन वेळा मोठ्या आवाजाने हादरलं. या आवाजासोबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज लावून प्रशासनाला माहिती दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कोणताही नोंद नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
चाळीसगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास हा आवाज शहरासह ग्रामीण भागात ऐकू आला. काही सेकंदाच्या अंतराने दुसऱ्यांदा तोच आवाज पुन्हा ऐकू आला आणि त्यासोबत हलकासा भूचालसदृश कंपनही जाणवले. यामुळे घबराट उडालेल्या नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचं सांगितले. तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.
चाळीसगाव तालुक्यात या गूढ आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अचानक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवलं. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. हा स्फोटासारखा आवाज नक्की कशामुळे झाला याबद्दल चर्चांना ऊत आलाय. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Discussion about this post