तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. सीसीएल म्हणजे सेंट्रल कोल्डफील्ड्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. अप्रेटिंस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.सेंट्रल कोलफिल्ड्समध्ये ११८० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२४ आहे.
या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. centrlcoalfields.in या वेबसाइटवर नोकरीबाबत सर्व अपडेट देण्यात आले आहेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.
या भरती मोहिमेत ४८४ पदभरती केली जाणार आहे. यामध्ये फ्रेशर आणि ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेटिंससाठी काही पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसिसवर उमेदवारांची निवड केली जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या साइटवर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.
जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही सध्या भरती सुरु आहे. एसबीआयमध्ये ११००पेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. कॅडर ऑफिसर पदासाठी रिक्त जागा आहेत.तुम्ही या नोकरीसाठीदेखील अर्ज करु शकतात.















Discussion about this post