सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. मॅनेजमेंट ट्रेनी, अकाउंटंट, सुपरिटेंडंट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. एचआर, मार्केटिंग, फायनान्स या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती cewacor.nic.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
सेंट्रल वेयरहाउसिंग कॉर्पोरेशनमधील या भरती मोहिमेत एकूण १७९ पदे भरती केली जाणार आहेत.यात मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ४० जागा रिक्त आहे. टेक्निकल मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १३ पदे रिक्ट आहेत. अकाउंटंट पदासाठी ९ पदे रिक्त आहेत. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ८१ जागा रिक्त आहेत. ही पदभरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सूचना पाहावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांकडे सप्लाय अँड मॅनेजमेंटमध्ये एमबीए, मास्टर्स पदवी, बॅचलर ऑफ कॉमर्स, सीए, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २८ असावी. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी २९००० ते १८०००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.















Discussion about this post