केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षा येत्या ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना १८ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.टीईटी परीक्षेनंतर सीटीईटी परीक्षा घेतली जात आहे. २७ नोव्हेंबरपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सीटीईटी परीक्षा देशभरातील विविध प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाते. सर्वसाधारण संवर्गातील उमेदवारांना पेपर १ साठी एक हजार रुपये तर दोन्ही पेपर साठी १ हजार २०० रुपये एवढे शुल्क आहे. एस.सी., एस.टी. संवर्गातील उमेदवारांसाठी पेपर १ साठी पाचशे रुपये तर दोन्ही पेपरसाठी ६०० रुपये शुल्क आहे.
उमेदवार https://ctet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज व शुल्क भरू शकतात. सीटीईटीचा दुसरा पेपर सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेत घेतला जाणार आहे. पेपर क्रमांक १ दुपारी अडीच ते पाच या कालावधीत घेतला जाणार आहे.















Discussion about this post