तुम्हीही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. विशेष या भरतीद्वारे तब्बल ३,५८८ पदे भरली जाणार आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु पण आहे.
ही भरती सीमा सुरक्षा दलमध्ये केली जात आहे. बीएसएफमध्ये तुमचंही नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होऊ शकते. अद्यापही तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला नसेल तर ताबडतोब अर्ज करावा. बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन पदांसाठी ही भरती सुरु आहे.
या नोकरीसाठी तुम्ही bsf.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी २५ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.
या भरती मोहिमेत ३,५८८ पदे भरली जाणार आहे. यातील ३,४०६ पुरुष उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. १८२ पदे ही महिला उमेदवारांसाठी असणार आहे. मोची, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर ट्रेडमधील भरती जाहीर करण्यात आली आहे.
BSF मधील या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाउटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.
टेक्निकल ट्रेडमधील पदांसाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचा कोर्स करुन ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेली असावी. नॉन टेक्निकल पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत स्कील्ड असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
Discussion about this post