महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. त्यातील एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. या योजनेत महिलांना गुंतवणूकीवर भरघोस परतावा मिळतो.
या योजने महिला गुंतवणूक करु शकतात.महिलांसोबतच पालकदेखील आपल्या मुलींसाठी या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. भविष्यात महिलांना आर्थिक अडचण येऊ नये, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी ठरतात. सरकारने फक्त २ वर्षासाठी ही योजना राबवली आहे. २०२३-२५ या वर्षांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर महिलांना ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत महिला फक्त दोन वर्षासाठी गुंतवणूक करु शकतात. महिला जास्तीत २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता.
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत भरघोस व्याज दिले जाते. त्याचसोबत टीडीएस कपातीतूनदेखील सूट दिली जाते. या योजनेत ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपये आहे त्यांनाच टीडीएस लागू होईल. तुम्ही या योजनेत १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी खाते उघडू शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत जर तुम्ही २ लाख रुपये गुंतवणूक केली तर दोन वर्षांनी तुम्हाला २.३२ लाख रुपये परत मिळतील. तु्म्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल.
Discussion about this post