जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बी.बी.ए., बी.बी.एस., बी.एम.एस. (ई-कॉमर्स), बी.सी.ए., एम.एम.एस. (कॉम्पुटर मॅनेजमेंट), एम.एम.एस. (पर्सोनेल मॅनेजमेंट), एम.सी.ए. (Integrated) व एम.बी.ए. (Integrated) या वर्गाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा दि. १० जुलै, २०२३ रोजी घेतली जाणार आहे.
केंद्रिय सामाईक प्रवेश परीक्षांचे परीक्षा केंद्रे पुढील प्रमाणे आहेत :
१) के.सी.ई. सोसायटीचे आय.एम.आर., जळगाव, २) अॅङ सिताराम आनंदरामजी बाहेती महाविद्यालय, जळगाव ३) भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, ४) धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, ५) बी.पी.कला, एस.एम.ए. विज्ञान व के.के.सी. वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव, ६) झेड.बी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे, ७) आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, ८) आर.सी. पटेल इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, शिरपूर, ९) एस.टी.को.ऑप. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, शहादा, १०) नंदुरबार तालूका विधायक समितीचे जी.टी.पाटील कला, वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार या दहा परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) दि. १९ जून, २०२३ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर प्रवेश अर्ज संकेतस्थळावर भरण्याची अंतीम मुदत दि. ३० जून, २०२३ पर्यंत आहे. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी दि. ६ जुलै, २०२३ रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांन ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रक्रिया शुल्क रूपये ५००/- ऑनलाईन नेट बँकिंग आणि युपीआय द्वारे भरावयाची आहे. भरलेला प्रवेश अर्ज व फीची पावती विद्यार्थ्यांनी स्वत:कडेच ठेवायची आहे. भरलेला अर्ज विद्यापीठात किंवा महाविद्यालयात जमा करावयाचा नाही. कृपया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
दि. ८ जुलै, २०२३ रोजी पात्र विद्यार्थ्यांची अंतीम यादी जाहीर करण्यात येईल. दि. ९ जुलै, २०२३ रोजी विद्यापीठ संकेतस्थळावर सामाईक प्रवेश परीक्षेचे परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध होतील. प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो व त्यावर प्राचार्यांचा सही शिक्का घेण्यात यावा. सदरची परीक्षा दि. १० जुलै, २०२३ रोजी वर दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. असे केंद्रिय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा.ए.पी.डोंगरे , अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा यांनी कळविले आहे.
Discussion about this post