बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन भरती आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर 2024 पासून बँकेच्या www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. या भरतीच्या परीक्षेची तारीखही अधिसूचनेत जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी पदानुसार पात्रता बदलली जात आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. ही वयोमर्यादादेखील पदानुसार बदलते.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. एकूण २५३ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी centralbankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर रिक्रूटमेंट वर क्लिक करा. त्यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर Click Here For New Registration वर क्लिक करा.
यानंतर तुम्ही इतर माहिती, फोटोग्राफ आणि सही अपलोड करा.
यानंतर तुम्ही शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करु शकतात.
Discussion about this post