सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. सेंट्रल बँकेत काउंसलर आणि बीसी सुपरवाइजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती होणार आहे.
या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार ४ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
सेंट्रल बँकेत एफएलसी काउंसिलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. एमएस ऑफिस, इंटरनेट आणि टाइपिंग यायला हवे. स्थानिक भाषेत टायपिंग करता यायला हवे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राष्ट्रीय बँकेत किंवा रुरल बँकेत स्केल १ ऑफिसर किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर काम केलेले असावे. सेवानिवृत्त किंवा वीआरएसप्राप्त अधिकारी या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
बीसी सुपरवाइजर पदासाठी रिटारर्ड किंवा फ्रेशर्स कोणीही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवाराने एम.एससी (IT)/BE (IT)/ MCA/MBA केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय २१ ते ४५ वयोगटातील असावे. रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्ष ते ६४ वर्ष असावे. (Central Bank Of India Recruitment)
पगार
काउंसलर आणि सुपरवाइजर पदासाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. एफएलसी काउंसलर पदासाठी २५००० रुपये पगार तर बीसी सुपरवाइजर पदासाठी १५००० रुपये पगार मिळणार आहे.
तिरुवनंपुरम येथील सेंट्रल बँकेत ही भरती केली जाणार आहे. तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या फॉर्मॅटनुसार फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रीजनल ऑफिस, सेकंड फ्लोर, सीएस बिल्डिंग, पुलिमोडू एमजी रोड, तिरुवनंतपुरम, केरळ ६९५०००१ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post