सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार CDAC च्या अधिकृत वेबसाइट (cdac.in) द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ६४६ रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
मॅनेजर आणि प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी ही भरती होणार असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२५ आहे.
या पदांसाठी भरती
प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित विषयात बी.टेक/बी.ई., एम.ई./एम.टेक., एमसीए, एम.फिल./पीएच.डी. पदवी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर निकषांबद्दल तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचना पहा.
वयोमर्यादा
तपशीलवार जाहिरातीत प्रत्येक पदासाठी उच्च वयोमर्यादा स्वतंत्रपणे निर्दिष्ट केली आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकारच्या नियमांनुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), अपंग व्यक्ती (PwD) आणि माजी सैनिक (ESM) यांच्या उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.
| जाहिरात | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
या केंद्रांवर भरती होणार
या भरती बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नोएडा, पुणे, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथे आहेत.
अर्ज कसा करायचा?
१. सीडीएसीच्या अधिकृत वेबसाइट www.cdac.in ला भेट द्या.
२. करिअर बटणावर क्लिक केल्यानंतर,
३. नोंदणी फॉर्म लिंकवर क्लिक करा.
४. पुढील पानावर, नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
५. आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि तुमचे कागदपत्रे अपलोड करा.
६. फॉर्म सबमिट करा. प्रिंटआउट घ्या.















Discussion about this post