सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (CCRAS) ने ग्रुप-अ, ग्रुप-ब आणि ग्रुप-क च्या विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), फार्मासिस्ट, संशोधन अधिकारी, स्टाफ नर्स आणि इतर पदे भरली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ccras.nic.in ला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. 22 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. या भरतीद्वारे एकूण 394 पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय पदानुसार स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांचे कमाल वय 27, 28, 30, 35 आणि 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट देखील दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
१०वी, १२वी उत्तीर्ण ते पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
(टीप : पदांनुसार पात्रता वेगवेगळी असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता तपासून घ्यावी यासाठी कृपया भरतीची जाहिरात पाहावी)
अर्ज शुल्क
गट-अ: सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी १००० रुपये.
गट-ब: सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी ५०० रुपये.
गट-क: सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी २०० रुपये.
निवड अशा प्रकारे केली जाईल
गट-अ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. गट-अ साठी ७० गुणांसाठी लेखी परीक्षा आणि ३० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. याशिवाय, गट-ब आणि गट-क साठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल.















Discussion about this post