भारतीय कापूस महामंडळात भरती निघाली असून तरुणांना मोठी संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2023 रोजी ही आहे. उमेदवार cotcorp.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.
उमेदवारांना cotcorp.org.in या संकेतस्थळावर पदाविषयीची सविस्तर माहिती मिळेल. कोणत्या पदासाठी, काय पात्रता आहे, याचा तपशील मिळेल. एकूण 93 जागांसाठी ही पदभरती राबविण्यात येईल. त्यासाठीची शैक्षणिक माहिती, पात्रता याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पदाचा तपशील :
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
पात्रता : मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 6 जागांसाठी पदभरती होईल. या पदासाठी एमबीए एग्री बिझनेस मॅनेजमेंट, एग्रीकल्चर ही शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.
मॅनेजमेंट ट्रेनी
पात्रता : अकाऊंट्स मॅनेजमेंट ट्रेनीच्या 6 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सीए, सीएमए, एमबीए फायनान्स, एमएमएस, एसकॉम वा इतर वाणिज्य शाखेतील पदवीधरांना या पदासाठी अर्ज करता येईल.
ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह
पात्रता : ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह या पदासाठी बीएससी एग्रीकल्चरमध्ये उमदेवाराला कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहे. 81 पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यात येईल.
वयोमर्यादा काय
या तीन ही पदासाठी वयोमर्यादा निश्चित आहे. या पदासाठी 30 वर्षे ही वयोमर्यादा आहे
पगार किती?
मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनी- 30,000-1,20,000 रुपये
अकाऊंट्स मॅनेजमेंट ट्रेनी- 30,000-1,20,000 रुपये
ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह- 22,000-90,000 रुपये
किती लागेल शुल्क
खुला व इतर प्रवर्गासाठी शुल्क – 1500 रुपये
एससी, एसटी, दिव्यांग – 500 रुपये