नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने ए, बी आणि सीअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही www.cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
सीबीएसईमध्ये एकूण २२४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग), असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (स्कील एज्युकेशन), अकाउंट्स ऑफिसर, सुप्रीटेंडेंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर अकाउंटंट, ज्युनिअर असिस्टंट अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह/अर्थशास्त्र, वाणिज्य, लेखा, वित्त, व्यवसाय अभ्यास, कॉस्ट अकाउंटिंग/एमबीए/चार्टर्ड अकाउंटन्सी/आयसीडब्ल्यूए/हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि १२ वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पदानुसार फॉर्म भरू शकतात. अकाउंट्स अकाउंटंट आणि कनिष्ठ सहाय्यकासाठी टायपिंगचा वेग देखील आवश्यक आहे. टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट असावा.
वयोमर्यादा
किमान वय १८ वर्षे पूर्ण केलेले असावे. पदानुसार कमाल वय २७-३५ वर्षे आहे. सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
पगार: वेतन स्तर २ ते स्तर १० पर्यंत पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा (टियर-१, टियर-२) मध्ये काही पदांसाठी मुलाखतीचा समावेश असेल.
अर्ज शुल्क: एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजी सैनिक/महिला उमेदवारांना गट अ, ब आणि क पदांसाठी अर्ज करण्यासाठी ₹२५० अर्ज शुल्क भरावे लागेल. अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील अर्जदारांना गट अ साठी ₹१७५०, गट ब साठी ₹१०५० आणि गट क साठी ₹१०५० भरावे लागतील.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला cbse.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर तुम्हाला भरतीसंबंधित लिंक दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे. यानंतर लॉग इन करावे.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करावी. या फॉर्मची एक प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post