नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यंदा सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे मंडळाने जाहीर केले आहे.
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल असा तपासा
CBSE बोर्डाचा results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
मुख्यपृष्ठावर, ‘CBSE 12वी निकाल थेट लिंक’ वर क्लिक करा.
लॉगिन पृष्ठ उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर उघडेल, तो तपासा.
विद्यार्थी येथून निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकतील आणि ती त्यांच्याकडे ठेवू शकतील.
सात हजार केंद्रावर झाली परीक्षा
सीबीएसई बोर्डाची १२वीची परीक्षा देशभरातील 7 हजार 126 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यावर्षी बारावीची परीक्षा 16 लाख 21 हजार 224 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील 14 लाख 26 हजार 420 विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाले. यंदा उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ८७.९८ होती. गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Discussion about this post