मुंबई । गेल्या दशकात मुलांमध्ये टाइप-२ मधुमेहात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्यासाठी शाळेत शुगर बोर्ड सुरु करण्यात येणार आहे.सीबीएसई संलग्न शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन करण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील मुलांमध्ये टाईप २ मधुमेहात लक्षणी वाढ झाल्याचे समोर आले आहे.यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांमध्ये मधुमेहाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करीत सीबीएसईकडून साखर मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिलेत
शाळांना १५ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यानंतर शुगर बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु होईल. सीबीएसईने स्पष्ट केल्यानुसार, शाळांनी यासंदर्भात आवश्यक ती कारवाई करावी; जेणेकरून निरोगी शालेय वातावरण निर्माण करता येईल.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ४ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोजच्या कॅलरीजच्या सेवनात साखरेचा वाटा १३ टक्के आहे. ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १५ टक्के आहे, तर दररोजच्या कॅलरीजचे सेवन फक्त पाच टक्के असावे. असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शाळांनी यासंदर्भात काय कारवाई केली, याचा सविस्तर रिपोर्ट फोटोसह येत्या १५ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
लहान मुलांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे असते. त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही चूक होऊ नये, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे आधीच काळजी घ्यायला हवी. त्यामुळेच सीबीएसई बोर्डाने शाळेतच शुगर बोर्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याची, शुगर लेव्हलची वारंवार तपासणी होईल. त्याप्रमाणे पुढे उपचार घेता येतील.
Discussion about this post