सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE बोर्ड) कडून बंपर रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. एकूण 212 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे.
सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. अशा परिस्थितीत, या रिक्त पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल. CBSE बोर्डाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आज १ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 जानेवारी 2025 पर्यंत वेळ मिळेल.
रिक्त पदाचा तपशील
सुपरिटेंडेंट पदाच्या 142 जागा रिक्त आहे. तर ज्युनियर असिस्टंट पदाच्या 70 जागा रिक्त आहेत.
आवश्यक पात्रता :
सुपरिटेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे गरजेचे आहे.
याप्रमाणे अर्ज करा
या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in ला भेट द्यावी.
वेबसाइटच्या होम पेजवर नवीनतम भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर, तुम्हाला CBSE बोर्ड अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक भर्ती 2025 च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता Apply Online च्या पर्यायावर जा.
अर्ज करण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरा.
यानंतर अर्ज भरा.
अर्ज केल्यानंतर, निश्चितपणे एक प्रिंट घ्या.
अर्जाची फी किती आहे?
सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फी जमा केल्यानंतरच या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. यासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 800 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय SC, ST, महिला आणि अपंग उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.
पगार : या पदांना वेतन स्तर २ अंतर्गत वेतन मिळेल. यामध्ये मूळ वेतन 19,900 ते 34,800 रुपये असेल.
Discussion about this post