मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE कडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १३ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता १२ वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २ एप्रिल २०२४ ला संपतील. परीक्षेच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती cbse.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीय.
गेल्या वर्षीही सीबीएसईने (CBSE) डिसेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर केलं होतं. मागील वर्षी बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून परीक्षा(Exam) सुरू झाल्या होत्या. तर १०वीच्या अंतिम परीक्षा २१ मार्चला संपल्या आणि १२ वीच्या परीक्षा ५ एप्रिलला संपल्या होत्या. मागील शैक्षणिक वर्षासाठी CBSE इयत्ता १०, १२ चे निकाल १२ मे २०२३ रोजी घोषित करण्यात आले होते.
Discussion about this post