नवी दिल्ली । देशातील विरोधकांवर सध्या ईडी, सीबीआयच्या धाडीचे सत्र सुरूच असून अशातच आता जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरु ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
सीबीआयच्या धाडीनंतर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, मागील ३-४ दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असा परिस्थितीत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात असल्याचे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
किरु हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाचे 2019 मध्ये सुमारे 2,200 कोटींना एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Discussion about this post