लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अकलूद येथील तपासणी नाक्यावर एका कारमध्ये ८ लाख ६५ हजारांची रोकड सापडली. हे चारचाकी वाहन भुसावळकडून फैजपूरकडे जात होते. वाहन मालकाला सापडलेल्या रकमेबाबत योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे रक्कम जप्त ती पुढील कार्यवाहीसाठी ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आली.
अकलूद येथे भुसावळकडून फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करून स्थिर सर्वेक्षण पथक नेमले आहे. हे पथक शुक्रवारी वाहन तपासणी करत होते. सकाळी पावणेदहा वाजता पांढऱ्या रंगाची कार (एमएच. १९- सीझेड. ८५६९) तेथून जात होती. पथकातील सदस्यांनी तपासणी केली असता कारमध्ये ८ लाख ६५ हजार १०० रुपयांची रक्कम आढळली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कार मालक संतोष सुरेशकुमार बना यांच्याकडे रकमेचे विवरण मागितले असता ते सादर करता आले नाही















Discussion about this post