मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठाकरे गटाने अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं महापालिका प्रशासनाचे म्हणणं असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे या पुलाचे काम आधी रखडवले होते. आमच्या मागणीनंतर ते पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केले, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.