वाराणसी : उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं एक भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला असून हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं हा अपघात झाला. कार आजमगढहून जौनपूरला निघाली होती. तर ट्रक जौनपूरहून केराकतकडे निघाला होता. दोन्हींची धडक होऊन हा अपघात झाला.
कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कुटुंबातील ६ जण ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. जखमींना उपचारासाठी जौनपूहून वाराणसीला पाठवण्यात आले आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. इतर ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिघांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले.
अहमदनगर हादरले! 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामूहिक अत्याचार, व्हिडीओ शूटिंगही केलं
कारमधील कुटुंबिय लग्नासाठी मुलगी बघायला निघाले होते. यात अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला. सर्वजण बिहारच्या सीतामढी इथं राहत होते. बिहारकडून प्रयागराजच्या दिशेने ते जात असताना कारचा अपघात झाला.
Discussion about this post