नवी दिल्ली । शिवसेना शिंदे गटातील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने हेमंत गोडसे हे अपघातातून बचावले आहेत. मात्र त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते.
यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा कारने (DL 7CW 2202) जोरदार ध़डक दिली. या अपघातात खासदार हेमंत गोडसे हे सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.















Discussion about this post