जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील जी.एम. फाउंडेशन भाजपा कार्यालयात यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून आली. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची कसून चाचपणी सुरू केली आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची प्रक्रिया पार पडत आहे. भाजप कार्यालयात ७५ जागांसाठी जवळपास ५५० पेक्षा अधिक उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. मुलाखतींना जिल्ह्याचे प्रभारी व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, भाजपाचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपात आलेले नितीन लढ्ढा यांच्यासह विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन पाटील आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
कार्यालय परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काही काळासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे कोर्ट परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक जामचा त्रास सहन करावा लागला.















Discussion about this post