मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेला जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. यातच उद्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 3 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत. यामुळे कोणते उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. काँग्रेसनेही आधीच काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उद्याप एकही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार कोण असणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. मातोश्री बंगल्यावर पार पडलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत एकमुखाने बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उद्या दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक पार पडेल आणि त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेत उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. अजूनही सांगली, भिवंडी आणि ईशान्य मुंबई लोकसभेचा तिढा कायम, असल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे.
कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?
ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर-पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर
उत्तर-पूर्व मुंबई -संजय दिना पाटील
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
परभणी – संजय जाधव
सांगली – चंद्रहार पाटील
मावळ – संजोग वाघेरे
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
Discussion about this post