हिंगोली । जगभरासह भारतात कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत असून यामुळे चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान संपूर्ण आरोग्य यंत्रणेला खडबडून जागा करणारा अहवाल समोर आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख 50 हजार महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीमध्ये तब्बल 13 हजार 500 महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता असल्याची लक्षणे आढळून आली आहेत.
जिल्ह्यात ‘संजीवन अभियान’ अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. सात हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा, 3500 जणींना स्तनाचा तर दोन हजार जणींना मुख कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे. या महिलांची आरोग्य विभागाकडून तालुकास्तरावर स्क्रिनींग केली जाणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
Discussion about this post