नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींच्या कामाची बातमी आहे. कारण, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये भरती प्र्करिया होत आहे. ही भरती ट्रेनी (सेल्स अँण्ड मार्केटिंग) पदासाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. खास बाब म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया होत आहे. केवळ मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयात 50% मार्क्ससह पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 31 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 30 वर्षे आहे. मार्केटिंग आणि सेल्सचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. संबंधित विषयावरील अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अर्ज कुठे करायचा?
ऑफलाईन अर्ज जनरल मॅनेजर, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7 वा मजला, मेकर चेंबर III, नरिमन पॉइंट, मुंबई-400021 या पत्त्यावर पाठवता येतील.
पगार आणि सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22,000 रुपये निश्चित स्टायपेंड मिळेल. याशिवाय, परफॉर्मन्सच्या आधारावर 2000 रुपयांपर्यंत बोनस देखील दिला जाईल. अशा प्रकारे, प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षणादरम्यान स्थिर उत्पन्न मिळेल आणि चांगल्या परफॉर्मन्सनुसार अधिकची कमाई करण्याची संधी मिळेल.
निवड प्रक्रिया
अर्ज तपासल्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते, जी उमेदवाराच्या ठिकाणावर अवलंबून असेल. मुलाखतीशी संबंधित सर्व माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. मुलाखतीसाठी कॉल आला म्हणजे निवड झाली असे नाही हे सुद्धा उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात पहावी. ही जाहिरात सविस्तर वाचून मगच आपला अर्ज दाखल करावा.















Discussion about this post