मुंबई । अजित पवार यांच्या निधनानंतर उपमख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सहभाग घेतला. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी अजितदादांनी सांगितलेल्या 3 महत्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलं. कॅबिनेटमध्ये बारामती क्रिडा संकुलाला 75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच वालचंदनगर-रत्नापूर MIDC साठी 1000 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यम मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरंदर येथील विमानतळाच्या उभारणीसाठी भूमी अधिग्रहण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भूमी अधिग्रहणास जो निधी लागणार आहे. त्या निधी उभारणीसही मान्यता देण्यात आलेली आहे. या विमानताळासाठी ज्या लोकांची जमीन जात आहे, त्या साधारण 96 टक्के लोकांनी जमीन देण्यास मान्यता दिलेली आहे.
एमएमआरडीएला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी जागा दिलेल आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू खरून जमीन अधिग्रहण करता येईल यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे तिसरी मुंबई संकल्पनेला चालना मिळेल.
जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 40 प्रकल्प आणि 100 कॅनल्स पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपये दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. हे सर्व प्रकल्प पुढच्या एक ते दोन वर्षात पूर्ण होतील.
बारामतीमध्ये 75 कोटींचे क्रीडा संकुल
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत अजित दादांनी सांगितलेल्या 3 महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी केलं शिक्कामोर्तब आहे. या बैठकीत बारामती इथं ७५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. वालचंदनगर – रत्नापूर MIDC साठी १००० एकर जागा उपलब्ध करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
अजितदादांचे तैलचित्र लावले जाणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ परिसरामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचे तैलचित्र विधिमंडळ परिसरात लावण्यात येणार आहे.















Discussion about this post